गाढवाच्या दुधापासून साबण बनवणारी महिला उद्योजक, विदेशात होत आहे मोठ्या प्रमाणात मागणी

soap
प्राण्यांच्या दूध आणि त्यांच्या गुणधर्मांबद्दल आपल्याला माहितीच असेल. पण आता चक्क गाढवाच्या दूधाची विक्री केली जात आहे. एक शेतकरी महिला गाढवाच्या दुधापासून बनविलेल्या साबणाची विक्री करत आहे आणि विदेशात या साबणाची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.

चंडीगडमध्ये सध्या 6 वा महिला ऑर्गेनिक मेळावा सुरू आहे. संपूर्ण देशातून या मेळावामध्ये महिला उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. ऑर्गेनिकचे संस्थापक पूजा यांनी गाढवाच्या दुधापासून साबण तयार केला आहे. हा साबण पाच प्रकारचे तेल आणि गाढवाच्या दुधाचा वापर करुन बनविला आहे. यासाठी पूजा या गाढव पाळणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क करुन त्याच्या कडून दूध खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. या मेळाव्याचे आयोजन महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे.
soap1
आंध्र प्रदेशात एक चमचा दुधाची किंमत 50 रुपये तर 2000 प्रती लीटरने विक्री होत आहे. दिल्लीतून पूजा या मेळाव्यासाठी आल्या आहे. त्या म्हणाल्या की, हा साबण युरोपियन देशांमध्ये प्रसिद्ध आहे आणि तेथील नागरिक गाढवाच्या दुधापासून तयार केलेल्या साबणानेच आंघोळ करतात.

भारतात गाढवांचा वापर केवळ भार वाहण्यासाठी केला जातो. मात्र आता भारतात पहिल्यांदा अशी संकल्पना आली आहे. आतापर्यंत त्यांनी 1500 साबणांची विक्री केली आहे. हे साबण परदेशात पाठविण्यात आले आहे. यामुळे गाढव पालन करण्याऱ्या शेतकऱ्यांची मोठी कमाई होत आहे. लोकांना हा साबण खूप आवडत असून, पुजा या आगामी काळात फेसवॉश, फेसक्रीम आणि मॉइस्चराइजर बाजारात आणणार आहेत.

Leave a Comment