कुमारस्वामींनी केला कर्नाटक सरकार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा

kumarswamy
बंगळुरू – कर्नाटकमध्ये आमदारांचा घोडेबाजार सुरू झाल्याच्या वृत्ताचा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी साफ इन्कार केला असून पुरेसे बहुमत सरकारजवळ असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपच्या संपर्कात काँग्रेसचे ६ ते ८ आमदार असल्याचे सोमवारी सांगितले जात होते. काही आमदारांशी संपर्क होऊ शकत नाही. दरम्यान, भाजपचे सर्व आमदार एका हॉटेलमध्ये एकत्र आल्याचे समजते. तर काँग्रेस आणि जनता दलावरच भाजप नेते येदियुरप्पा यांनी घोडेबाजाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, की आम्ही एक दोन दिवस दिल्लीतच थांबणार आहोत. कारण कुमारस्वामी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment