वादग्रस्त वक्तव्यानंतर पांड्यासाठी आता ‘प्यार प्यार ना रहा’

isha-gupta
सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पाड्यांवर सडकून टीका होत आहे. अशातच आता हार्दिकची कथित प्रेयसी इशा गुप्ताने देखील त्याच्यावर कडाडून टीका केली आहे.

आक्षेपार्ह टीका एखाद्या महिलेवर करणे हे पूर्णत: चूकीचे आहे. अशी आक्षेपार्ह विधाने करून जर तुमच्या कुटुंबीयांना काहीही फरक पडत नसेल असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या कुटुंबीयांसाठीदेखील हे काळजी करण्यासारखेच कारण आहे. असे वागणे माणूसकीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अक्षम्य आहे. आक्षेपार्ह विधान एका महिलेवर करणे सोप्प वाटत असेल तर तुम्हीच का मुलांना जन्म देत नाही? असा प्रश्नही तिने हार्दिकला विचारला आहे. इशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी होत्या. पण हार्दिक पांड्या आणि माझ्यात कधीच मैत्री नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment