टीम इंडियाचा विजय साकारुन धोनीने बंद केली टीकाकारांची तोंडे

team-india
अॅडलेड – टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दुस-या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक (१०४ धावा) आणि महेंद्रसिंह धोनीच्या (५५ धावा) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ चेंडू व ६ विकेट राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय लाभदायक ठरला नाही. शॉन मार्शचे (१३१ धावा) शतक वाया गेले. टीम इंडियाने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात बाजी मारली. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्यामुळे एकदिवसीय मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे २८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीने आपल्या डावाची आक्रमक सुरूवात केली होती. शिखर आज रोहितपेक्षा आक्रमक होता. पण धवन चेंडू फटकवण्याच्या नादात ३२ धावांवर बाद झाल्यानंतर रोहितची जोडी फलंदाजीस आलेल्या विराटबरोबर चांगली जमली होती. फटके मारण्याच्या नादात रोहितही ४३ धावांवर बाद झाला. अंबाती रायडूनेही बऱ्यापैकी फलंदाजी केली. त्याने २४ धावा केल्या.

महेंद्रसिंह धोनीला हाताशी घेत विराटने आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या कारकीर्दीती ३९ वे तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचे सहावे शतक त्याने पूर्ण केले. आपल्या खेळीत त्याने ५ चौकार व २ षटकार लगावले. धोनीने तो खेळपट्टीवर असेपर्यंत दुय्यम भूमिका स्वीकारली होती. कोहली शतकानंतर लगेचच बाद झाला. धोनीने त्यानंतर आपला पवित्रा बदलला. दिनेश कार्तिकच्या साहाय्याने त्याने धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफ, रिचर्ड्सन, स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने शतकवीर शॉन मार्श (१३१ धावा), ग्लेन मॅक्सवेलच्या (४८ धावा) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात टीम इंडियाला २९९ धावांचे आव्हान दिले. ९ बाद २९८ धावा ऑस्ट्रेलियाने केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ बळी टिपले. त्याला मोहम्मद शमीने ३ बळी घेत चांगली साथ दिली. रवींद्र जडेजाला एक गडी बाद करता आला. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजला आपला प्रभाव पाडता आला नाही.

Leave a Comment