समुद्र किनाऱ्यावर आढळले पहिल्या महायुद्धातील पाणबुडीचे अवशेष

Submarine2
पहिल्या महायुद्धादरम्यान वापरल्या जाणाऱ्या पाणबुडीचे काही भाग समुद्रात सापडले आहेत. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान कित्येक दशकापासून जर्मनीत बुडलेली पाणबुडी ही उत्तर फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर आढळुन आली आहे.
Submarine4
बीबीसीच्या अहवालानुसार, फ्रान्समधील कॅले शहरातील विसंट समुद्र किनाऱ्यावर यूसी-61 या जर्मन पाणबुडीचे अवशेष पाण्यातून वर येत आहेत. जुलै 1917 मध्ये ही पाणबुडी या ठिकाणी आणण्यात आली होती. मात्र याबाबत अद्यापही कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Submarine3
या पाणबुडीत पाणी शिरल्यानंतर त्यातील खलाशांनी पाणबुडीला या समुद्र किनाऱ्यावर सोडून जीव वाचवला. त्यानंतर 1930 पर्यंत ही पाणबुडी या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खाली रुतून बसली होती. ही पाणबुडी आता वर येत असल्यामुळे ती आता पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
Submarine1
जर्मनीच्या पाणबुड्यांना यू-बोट म्हटले जायचे. या पाणबुड्या युरोपातून धान्यसाठा आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश जहाजांना लक्ष्य करायच्या. अशी शेकडो जहाजे या यू-बोट्सनी बुडवली होती. ही पाणबुडी बेल्जियममधील झिब्रुगा बंदराहून निघून फ्रान्समधील बुलॉयन-सूर-मेर आणि ली हॅवरे बंदराजवळ सुरुंग पेरण्याच्या कामगिरीवर निघाली होती तेव्हा शत्रुराष्ट्राच्या नौदलाने तिला ताब्यात घेऊन विसंटच्या समुद्र किनाऱ्यावर आणले. आणि त्यानंतर पाणबुडीवरील 26 खलाशांनी फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली.
Submarine
यूसी-61 पाणबुडीने पाण्याखाली सुरुंगस्फोट घडवून किंवा पाण्याखालून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने जवळपास 11 जहाजे बुडवली होती, असे इतिहासकार सांगतात.

Leave a Comment