अजय देवगनच्या ‘टोटल धमाल’चा फर्स्ट लूक रिलीज

ajay-devgan
‘रेड’ चित्रपटानंतर अजय देवगनचा आगामी ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे बऱ्याच काळापासून शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अजय देवगनचा वेगळा लूक यात पाहायला मिळत आहे.

अजय देवगनसोबत ‘टोटल धमाल’च्या फर्स्ट लूकमध्ये हॉलिवूड सेंसेशन नावाने लोकप्रिय असलेले पात्र एनिमल क्रिस्टल दिसत आहे. अजयच्या खांद्यावर क्रिस्टल ही बसलेली दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो अजय देवगनने शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार, हेही या फर्स्ट लूकसोबत सांगितले आहे. हा ‘क्रिस्टल’चा पहिला बॉलिवूड डेब्यू आहे, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.


२२ फेब्रुवारीला ‘टोटल धमाल’ हा प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन सोबत यात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि पीतोबाश हे कलाकारही झळकणार आहेत. अजय देवगनच्या या फोटोत क्रिस्टल असल्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिस्टल ही हॉलिवूडच्या ‘हँगओव्हर-२’मधील माकड आहे. जॉर्ज ऑफ द जंगल आणि ‘नाईट अॅट द म्यूझिअम’ या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.

Leave a Comment