एका साध्या अंड्याने लोकप्रियतेत केली मॉडेलवर मात!

Egg
एका सामान्य तपकिरी अंड्याने इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेत एका मॉडेलवर मात केली आहे. या अंड्याच्या फोटोमागे कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला, परंतु त्याचा शोध अजून लागलेला नाही.

“चला, आपण एकत्रितपणे जागतिक विक्रम नोंदवू या आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक झालेली पोस्ट बनूया. कायली जेनर (18 दशलक्ष) हिचा सध्याचा विक्रम मोडूया. आपल्याकडे हे आहे,” अशी कॅप्शन या छायाचित्रसोबत होती. हे छायाचित्र 4 जानेवारी रोजी पोस्ट करण्यात आले होते.

कायली जेनर हिने 6 फेब्रुवारी 2018 रोजी आपली मुलगी स्टॉर्मी वेब्स्टरचा जन्म झाल्याची पोस्ट ही आतापर्यंतची सर्वाधिक लाईक मिळालेली पोस्ट होती. एगगँग नावाच्या खात्यावरून हे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते.


मात्र या अंड्याने सोमवारी सकाळपर्यंत 28 दशलक्षांपेक्षा जास्त लाईक मिळवून त्या विक्रमाला मागे टाकले आहे. स्वतः जेनरने एका अंड्यासोबत आपले छायाचित्र पोस्ट करून या अंड्याला दाद दिली आहे.

कायली जेनर ही अमेरिकेतील प्रसिद्ध रिअलिटी टेलिव्हिजन कलाकार, मॉडेल, उद्योजक आणि सोशल मीडियावरील स्टार आहे.

Leave a Comment