सचिन बन्सल यांची ओला मध्ये १५० कोटींची गुंतवणूक

bansal
फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी ऑनलाईन कॅबसेवा देणारी कंपनी ओला मध्ये १५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कार्पोरेट अफेअर्स मंत्रालय अहवालानुसार बन्सल यांनी जे सिरीज प्रेफारेन्शीयल शेअर खरेदी केले आहेत.

वॉलमार्टने फ्लिपकार्टचे १ लाख कोटी मोजून अधिग्रहण केले असून कंपनीच्या एकूण हिश्श्यातील ७७ टक्के वाटा मिळविला आहे. त्यानंतर बन्सल फ्लिपकार्ट मधून बाहेर पडले होते. ओला ब्रांडचे नियंत्रण एएनआय टेक कडे असून बन्सल येथे एकूण ६५० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे. बन्सल यांनी फ्लिपकार्टचे शेअर विकून प्रचंड पैसा मिळविला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कारण त्यांनी २०१८-१९ साठी अडव्हांस करापोटी ६९९ कोटी जमा केले होते.

ओला देशातील १०० शहरात कार्यरत असून सप्टेंबर मध्ये त्यांनी युके मध्ये व त्याअगोदर ऑस्ट्रेलिया मध्येही सेवा सुरु केली आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ मध्ये केली होती.

Leave a Comment