प्रतिकूल परिस्थितीत देशसेवेत तत्पर भारतीय सेना

siachin
आज १५ जानेवारीला भारतीय सेना दिवस म्हणजे इंडिअन आर्मी डे साजरा होत आहे. देशाची आन बान आणि शान असलेले आपले लष्कर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत देशसेवेसाठी तत्परतेने खडे आहे. जगातल्या सर्वाधिक उंचीच्या सीमेचे रक्षण करणाची कामगिरी भारतीय लष्कर पार पाडत असून इंडिअन आर्मीला सर्वात मोठे व्हॉलिंटीअर मिलिटरीचा दर्जा मिळालेला आहे.

जगातील सर्वाधिक उंचीवरची सीमा सियाचीन ग्लेशिअर येथे हाडे गोठविणाऱ्या थंडीमध्ये भारतीय लष्कर ठाम पाय रोवून उभे आहे आणि तेथे जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. समुद्रसपाटीपासून १६ हजार फुट उंचीवर जगातील हि सर्वात उंच सीमा आहे.

इंडियन आर्मीमध्ये १२ लाख सक्रीय सैनिक आहेत तर ९ लाख राखीव जवान आहेत. आपले पायदळ जगातील दोन नंबरचे मोठे पायदळ असून सर्वात उंच जागी पूल बांधण्याचा पराक्रम भारतीय सेनेच्या नावावर आहे. हा पूल बेली ब्रिज नावाने ओळखला जातो. तो १८३७९ फुट उंचीवर हिमालयाच्या द्रास आणि सुरु नद्यांवर बांधला गेला आहे.

भारतीय सेनेने आपणहोऊन कधीच कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही तसेच कोणत्याची देशावर कब्जा केलेला नाही हे त्यांचे विशेष आहे. उत्तराखंड मधील प्रलयाच्या वेळी लष्कराने राबविलेले रेस्क्यू ऑपरेशन हे सर्वात मोठे आणि यशस्वी ऑपरेशन आहे. कझाकिस्तान येथे भारतीय लष्कराचा आउटस्टेशन बेस आहे.

Leave a Comment