थंडीच्या कडाक्यात नो पँटस सबवे राईडला उत्स्फूर्त प्रतिसाद

without
यंदाच्या नो पँटस सबवे राईड या वार्षिक कार्यक्रमाच्या दिवशी तब्बल २ हजार लोकांनी थंडीचा कडक असतानाही पँटविना सार्वजनिक वाहनातून प्रवास केला. न्यूयॉर्कमध्ये कडाक्याची थंडी असून पारा उणे ८ डिग्रीवर होता. तरीही रविवारी अनेक महिला पुरुष या राईड मध्ये सहभागी झाले. केवळ न्यूयॉर्कच नाही तर ब्रसेल्स ते बीजिंग आणि सिडनी ते बर्लिन शहरातही प्रवाशांनी पँट, स्कर्ट न घालता मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहनातून प्रवासाचा आनंद लुटला.

मिळालेल्या माहितीनुसार २००२ मध्ये न्यू कॉमेडी ग्रुपने इम्प्रूव्ह एव्हरीवेअर या मजेदार दिवसाची सुरवात केली. नो पँटस सबवे राईड असे त्याचे नामकरण केले गेले. त्याचा उद्देश लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणावे असा होता. जेव्हा पँट किंवा स्कर्ट न घालता लोक मेट्रो किंवा बस मध्ये चढत तेव्हा बाकीच्यांना हसू आवरणे अवघड होत असे. आणि या दिवसाचा उद्देशाच तो होता. यंदा २ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा दिवस साजरा केला.

Leave a Comment