गंगासागर किनाऱ्यावर सापडते सोने चांदी

gangasagar
आज मकरसंक्रांत. या दिवशी प.बंगाल मधील गंगासागर या पवित्र ठिकाणी स्नान करण्यासठी भाविक मोठ्या संखेने येत असतात. या ठिकाणी गंगा सागराला मिळते आणि संक्रांतिदिवशी समुद्रात असलेल्या मंदिरात जाण्याचा मार्ग मोकळा होतो म्हणून या स्थानाला विशेष महत्व आहे. या तीर्थक्षेत्राचे एकदा तरी दर्शन घडावे अशी हिंदू भाविकांची इच्छा असते.

या किनाऱ्यावर वाळूत सोने चांदी मिळते. येथील स्थानिक लोक हातात आचोर नावाचे हत्यार घेऊन वाळू उपसत असलेले पाहायला मिळतात. या उद्योगातून त्यांना काही ना काही सोन्या चांदीची वस्तू, दागिने मिळतात. याचे कारण म्हणजे मकरसंक्रांत, माघ पोर्णिमा तसेच अन्य पवित्र दिवशी येथे स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात तेव्हा गर्दीत बोटातील अंगठी, कानातले झुमके, नाकातल्या चमक्या समुद्रात कधी पडतात ते अनेकाना कळत नाही. गंगासागराची अशी महती सांगितली जाते कि तो आपल्या पोटात दुसऱ्याचे काहीच ठेऊन घेत नाही. त्यामुळे या वस्तू किनाऱ्यावर वाहत येतात आणि वाळूत दाबल्या जातात.

येथील स्थानिक वाळू उपसून अश्या वस्तू शोधतात आणि त्यांना समुद्रदेवतेची भेट म्हणून स्वीकारतात. दागिने मिळाले तरी त्याची खबर पोलिसांना दिली जात नाही. कारण वाळू उपसण्याच्या मेहनतीचे ते फळ मानले जाते आणि अश्या मिळालेल्या वस्तू विकून अनेक परिवारांचा उदरनिर्वाह चालतो.

Leave a Comment