सीबीआयच्या नव्या कार्यालयात भूत असल्याची चर्चा

cbioffice
दिल्लीतील लोधी रोड येथे असलेल्या सीबीआयच्या नव्या कार्यालयात वास्तुदोष असून येथे भूत आहे अशी चर्चा सीबीआय अधिकारी वर्गात सुरु झाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था म्हणजे सीबीआय मध्ये सध्या भूकंप झाल्याप्रमाणे स्थिती असून या संस्थेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांमधील लढाईने देशाचे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. त्यामुळे नवे कार्यालय पछाडलेले आहे असा अनेकांचा विश्वास आहे.

वास्तविक २०११ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग याच्या हस्ते या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले गेले होते. तेव्हापासून येथील तीन प्रमुख चौकशीच्या घेऱ्यात अडकले आहेत. प्रथम २०१० ते २०१२ या कार्यकाळात ए.पी. सिंग, त्यानंतर २०१२ ते १४ या कार्यकाळात रंजित सिन्हा आणि २०१७-१८ या काळात अलोक वर्मा चौकशीच्या फेऱ्यात सापडले. मधल्या काळात अनिल सिन्हा यांच्याकडे सीबीआयची सूत्रे होती मात्र त्याच्याविरोधात कोणतीही चौकशीची वेळ आली नाही.

सध्या अलोक वर्मा यांना कोर्टाने नियुक्त करण्याचे आदेश देऊनही एक दिवसाच्या नियुक्तीनंतर त्यांना हटविले गेले आहे. राकेश अस्थाना आणि अलोक वर्मा यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप केल्याने अन्य अधिकाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे. यामुळेच सीबीआय सध्या चर्चेत आहे. त्यात आता नव्या कार्यालयात भूत असल्याचे प्रकरण चर्चिले जात आहे.

Leave a Comment