१ फेब्रुवारीपासून १५३ रुपयात पाहा १०० चॅनेल

DTH
नवी दिल्ली – दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (ट्राय) डीटीएच कंपन्यांना जनतेला दिलासा देणारा आदेश दिल्यामुळे १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना फक्त १५३ रुपयात १०० प्रसारण वाहिन्या पाहता येणार आहेत.

मोफत आणि शुल्क अशा दोन्ही प्रसारण वाहिन्यांचा १०० प्रसारण वाहिन्यात समावेश आहे. पण ३१ जानेवारीपूर्वी ग्राहकांना मोफत असलेल्या प्रसारण वाहिन्यांची निवड करावी लागणार आहे. एचएडी प्रसारण वाहिन्यांचा या पॅकमध्ये समावेश नाही. ट्रायच्या निर्देशानंतर डीटीएच कंपन्यांनी ग्राहकांना एसएमएस पाठवून माहिती देत आहे.

ट्रायने यापूर्वीच पाहिजे तेवढ्या प्रसारण वाहिन्या निवडून तेवढेच शुल्क ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचे आदेश डीटीएच कंपन्यांना दिले आहेत. पण पुरेशी माहिती ग्राहकांना मिळत नसल्यामुळे त्यांना ट्रायने काही संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. जर ग्राहकांना काही शंका असतील तर त्यासाठी ते [email protected] किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क करू शकतील, असे ट्रायने म्हटले आहे.

Leave a Comment