पुणेकर महिलेने ५० हजारात चक्क चंद्रावर घेतली जमीन

moon
पुणे – देश-विदेशात नाही तर चक्क चंद्रावरच जमीन पुण्यातील एका महिलेने खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेची या खेरदी व्यवहारात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिलेने चंद्रावर जमीन खरेदीबाबत जाहिरात पाहिली. तिने त्या जाहिरातीनुसार संबंधित संस्थेकडे एक एकर जमीन खरेदीसाठी ५० हजार रुपये भरले. पण त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी लक्षात आल्यामुळे आता नेमकी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न त्या महिलेला पडला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेचे नाव राधिका दाते वाईकर असे असून १३ वर्षापूर्वी राधिकाने पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी वाचली. तिने तेव्हा आपल्यासाठीही जमीन खरेदीसाठी ‘त्या’ संस्थेकडे ६ नोव्हेंबर २००५ मध्ये ५० हजार रुपये जमा करून चंद्रावर एक एकर जमिनीचे बुकींग केले होते. त्यानंतर खरेदी व्यवहारानुसार संबंधित संस्थेने राधिका यांना खरेदीपत्राची बनावट कागदपत्रेही दिली होती.

आता राधिका यांनी १३ वर्षांचा काळ लोटल्यानंतर त्या कागदपत्राची तपासणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तेव्हा कपाळावर हात मारून घेतला. राधिका यांच्यासमोर नेमकी या प्रकरणाची तक्रार कोणाकडे करायची हा यक्ष प्रश्न उभा आहे.

Leave a Comment