कॅथे पॅसिफिकची परत तीच चूक – महागडे तिकिट विकले स्वस्तात

जगातील आघाडीची विमानसेवा कंपनी असणाऱ्या कॅथे पॅसिफिकने दोन आठवड्यांच्या परत चूक केली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानाचे तिकिट कंपनीने अगदी स्वस्तात विकले आहे.

कॅथे पॅसिफिकच्या संकेतस्थळावर रविवारी विकल्या जाणाऱ्या तिकिटांमध्ये हा घोळ झाला होता. लंडनहून कनेक्टिंग फ्लाईट असलेल्या लिस्बन ते हाँगकाँग या प्रवासासाठीचे पहिल्या दर्जाचे तिकिट केवळ 1512 डॉलरमध्ये विकण्यात येत होते. फ्रँकफूर्टमार्गे हाच प्रवास केल्यास त्याचे तिकिट मात्र तब्बल 16 हजार डॉलर एवढे होते, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्राने म्हटले आहे. अगदी मोजक्या नशीबवान ग्राहकांनाच या गफलत झालेल्या दरांचा फायदा मिळणार आहे. अन्य सर्वांकडून नेहमीप्रमाणे तिकिटाटी किंमत वसूल करण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी कॅथे पॅसिफिक एअरवेजने 16,000 डॉलरची पहिल्या दर्जाची तिकिटे केवळ 675 डॉलरला विकली होती. व्हिएतनाम ते कॅनडा आणि व्हिएतनाम ते अमेरिका या मार्गावर हा घोळ झाला होता.

“आम्ही या चुकीमागच्या कारणांचा शोध घेत आहोत. इनपुटच्या समस्येमुळे ही चूक झाली असावी,” असे कंपनीच्या एका प्रवक्त्याने म्हटल्याचे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

यापूर्वी सिंगापूर एअरलाईन्स आणि हॉंगकॉंग एअरलाईन्सने अशी चूक केली होती.

Leave a Comment