गुगल आणतेय बिनाचार्ज चालणारा स्मार्टफोन वाइल्ड

cellphone
गुगलने विना बॅटरीचा आणि पूर्ण लाईफ विना चार्जर वापरता येणारा स्मार्टफोन विकसित केला असून वाइल्ड नावाने तो युएस नॅशनल सायन्स फौंडेशनच्या मदतीने तयार केला गेला आहे. स्मार्टफोन रोजच्या जीवनाचा आवश्यक घटक बनला आहेच. मात्र हा फोन चार्ज करण्याचे झंझट युजर मागे असते. त्यावर पॉवर बँक सारखे अनेक पर्याय युजर वापरत आहेत. मात्र दीर्घ काळाच्या संशोधनातून तयार झालेल्या हा स्मार्टफोन कधीही चार्ज करावा लागणार नाही. संशोधक वामसी ताला यांनी हा फोन विकसित केला आहे.

मिळालेला माहितीनुसार या एकलबोर्ड सेलफोन आणीबाणीत सर्वसामान्य फोन प्रमाणे वापरता येणार आहे.या फोनला ऑटोमेटिकली सूर्यकिरणांपासून उर्जा घेता येते तसेच तो टेलिफोन कंपन्यांच्या नेटवर्क टॉवर मधून निघणाऱ्या रेडीओ लहरीतून उर्जा घेऊ शकतो. भूकंप, पूर व अन्य नैसर्गिक संकटात हा उपयुक्त आहे. तसेच प्रवासात पॉवरबँक अथवा चार्जर नसतानाची तो सर्व्हिस देऊ शकतो. पहाडी भागात त्याचा चांगला उपयोग होतो. या फोनवर स्काईपवरून व्होईस कॉल करता येतो. अर्थात त्यासाठी ३ मायक्रो वॅट उर्जा वापरली जाते. हे प्रमाण सामान्य फोनच्या तुलनेत १० हजार पट अधिक आहे.

Leave a Comment