एव्हरेडी बॅटरी कंपनी विकली जाणार

eveready
बीएम खेतान याच्या नेतृत्वाखाली चालविली जात असलेली विलियमसन मॅगर ग्रुप फ्लॅगशिप कंपनी एव्हरेडी इंडस्ट्रीजची विक्री केली जात असून त्यासाठी ग्राहक शोधण्याचे काम महिंद्र कोटक बँकेकडे सोपविले गेले असल्याचे समजते. हि कंपनी ३ ते ४ हजार कोटींना विकली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एव्हरेडी ड्रायसेल बॅटरी, फ्लॅशलाईट क्षेत्रातील देशातील नंबर एक कंपनी आहे. विलियमसन या कंपनीत काही भागीदारी ठेवेल असे सांगितले जात आहे. खेतान कडे या कंपनीचे ४५ टक्के शेअर आहेत. २०१७ -१८ सालात या कंपनीने १४५० कोटींचा महसूल मिळविला असून या वर्षात हा महसूल १६०० कोटींवर जाईल असा अंदाज आहे. १०० वर्षांची हि जुनी कंपनी १९०५ मध्ये युनियन कार्बाईडच्या मालकीची होती ती खेतान परिवाराने १९९० च्या दशकात ३०० कोटी मध्ये खरेदी केली होती.

Leave a Comment