मसुरीच्या ओसाड भागात सुरु होतेय घोस्ट टुरिझम

tourisum
पहाडांची राणी निसर्गरम्य मसुरी देशविदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. साहसी पर्यटकांना येथे हॉरर दुनियेचा अनुभव देणारे पर्यटन लवकरच अनुभवता येणार आहे. मसुरीच्या सुंदर डोंगररांगामध्ये अश्या अनेक जागा आहेत ज्या झपाटलेल्या आहेत. या ठिकाणी तंबू ठोकून राहण्याचा थरार पर्यटक अनुभवू शकणार आहेत.

मसुरीच्या हाथीपाव, लंबीधार, झाडीपानी, राजपूर या भागात अशा जागा आहेत. येथे पूर्वी चुनखडीच्या खाणी होत्या मात्र या खाणीमुळे पहाडांचे नुकसान होऊ लागल्याने आणि त्या बंद करण्यासंदर्भात अनेक याचिका आल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या खाणी बंद केल्या. तेव्हापासून त्या ओसाड बनल्या आहेतच पण तेथे मजूर वर्गासाठी बांधलेली घरेही मोडकळीस आली आहेत. १९६० च्या दशकात या खाणी सुरु केल्या गेल्या आणि १९९० ला पूर्ण बंद झाल्या.

lambidhar
या ठिकाणी खाणीत काम करताना अनेक मजूर मृत्युमुखी पडत असत. त्यामुळे विशेषतः लंबीधार भागात मोडकळीस आलेल्या घरातून अनेकदा रात्रीचे विचित्र आवाज येतात. कधी कधी टाळ्यांचा तर कधी ओरडण्याचे आवाज येतात. वर्ल्ड पॅरानॉर्मल सोसायटीने हा भाग झपाटलेला म्हणून घोषित केला आहे. येथे अचानक अंधारून येण्याची घटनाही घडते. स्थानिक लोक भुतांच्या अनेक कथा सांगतात.

या भागात साहसपूर्ण आणि रोमांचक प्रवासाचा अनुभव घेता यावा यासाठी घोस्ट टुरिझम सुरु केले जात आहे. या भागात ज्यांच्या जमिनी आहेत ते येथे तंबू ठोकून पर्यटकांना आकर्षित करण्याचा पर्यंत करत आहेत. घोस्ट वॉकचा थरारही अनुभवता येणार आहे.

george
वास्तविक या भागात जगातील उत्तम प्रतीचा संगमरवर दगड मिळतो. त्यासाठी या खाणी सुरु केल्या गेल्या होत्या. अश्या सुमारे ५० खाणी येथे आहेत पण आता त्या बंद पडल्या आहेत. जॉर्ज एव्हरेस्ट हाउस हे समुद्रसपाटी पासून ६ हजार फुट उंचीवरचे ठिकाण हातीपाव भागात असून येथे इको टुरिझम सुरु केले जात आहे.

Leave a Comment