ट्रम्पना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर हवीय इवान्का

ivanka
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची कन्या इवान्का जागतिक बँकेची अध्यक्ष म्हणून हवी असल्याची बातमी फायनान्शियल टाईम्सने दिली आहे. इवान्का सध्या व्हाईट हाउसची सल्लागार म्हणून काम पाहत आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा जिम योंग किक यांनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने हे पद सध्या रिक्त असून त्यावर संयुक्त राष्ट्राच्या अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हेली, डेव्हिड माल्पास, युएसअआयडीचे मार्क ग्रीन, इंद्रा नुयी यांच्या नावासाठी चर्चा सुरु आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर उभरत्या अर्थव्यवस्थाच्या आर्थिक विकास योजनांना निधी पुरविण्यासाठी जागतिक बँकेची स्थापना केली गेली होती. या बँकेवर परंपरेने अमेरिकी नेतृत्व नेमले जाते. इवान्का यांना आंतरराष्ट्रीय व्यापार अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नाही. त्या व्यावसायिक आहेत. ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमेरिकी राजदूत म्हणूनची इवान्का याची नेमणूक करायची होती मात्र त्यावर खूपच टीका झाल्याने हि नेमणूक केली गेली नाही असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment