जिलेटने हार्दिक पंड्याशी घेतला काडीमोड

gillette
कॉफी वुईथ करन शो मध्ये महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याला चांगलीच भोवत असून मेन शेविंग रेझर ब्लेड बनविणाऱ्या जिलेट या प्रसिद्ध कंपनीने हार्दिकला आता नारळ दिला आहे. जिलेटचा नव्या मॅच थ्री उत्पादनाचा हार्दिक सदिच्छा दूत होता मात्र हा करार ताबडतोब संपुष्ट आणला जात असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

हार्दिकने महिलांसंदर्भात कार्यक्रमात तोडलेल्या तारयांमुळे त्याच्यावर सर्व थरातून टीका होत आहेच. ऑस्ट्रेलियातील तीन वनडे मालिकेतून त्याला हद्दपार केले गेले आहे तसेच बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल लोकेश यांना निलंबितही केले आहे. त्यापाठोपाठ जिलेटने हार्दिक बरोबरचा करार संपुष्टात येत असल्याचे जाहीर केले आहे. हार्दिकची वक्तव्ये कंपनीच्या आदर्शांच्या विरोधात असल्याचे कारण त्यासाठी दिले गेले आहे. हार्दिक गल्फ ऑइल, झगल इ पेमेंट प्लॅटफॉर्म, सर डेनिम्ससाठीहि जाहिराती करतो आहे.

Leave a Comment