क्रांतिकारी डिझाईनचा टूथब्रश, किंमत ९ हजार रुपये

brush
अमेरिकेतील लास वेगास येथे चार दिवस सुरु असलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रोनिक शो मध्ये फ्रेंच कंपनी फास्टीश ने नव्या क्रांतिकारी आकाराचा टूथब्रश सादर केला आहे. हा ब्रश इंग्रजी वाय या आकाराचा असून तो इलेक्ट्रिक ब्रश आहे. हा ब्रश १० सेकंदात दात साफ करतो असा दावा केला जात आहे.

हा ब्रश दातांवर फीट बसवायचा आणि बटन दाबले की दात घासले जातात. त्याचे डिझाईन असे आहे कि ते दातावर सहज फिट होते. प्रथम पेस्ट लावून खालच्या दातांवर तो बसविला की ५ सेकंदात खालचे व याच पद्धतीने ५ सेकंदात वरचे दात स्वच्छ केले जातात. लहान मुळापासून मोठ्यापर्यंत तो सर्वाना वापरता येतो आणि हा ब्रश १० टक्के अधिक जंतू मारतो असाही दावा केला जात आहे.

tooth
या ब्रशची सध्याची किंमत १२५ डॉलर्स म्हणजे ९ हजार रु. असून तो एप्रिलपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. गेली १४०० वर्षे टूथब्रश च्या डिझाईनमध्ये बदल झालेला नाही असे म्हटले जाते. चीन मध्ये ६१९ इसवी पूर्वी दोन बांबूच्या काड्याच्या मध्ये जनावराचे केस लावून त्याने दात घासले जात असत. भारतात फार प्राचीन काळापासून कडूनिंबाच्या काड्याचे दातवण दात घासण्यासाठी वापरले जात आहे. आजही अनेक लोक हे दातवण वापरतात.

Leave a Comment