रणवीरला मोदींची गळाभेट घेऊन काय वाटले?

narendra-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच बॉलिवूड कलाकारांनी भेट घेतली. बॉलिवूडमंडळी या बैठकीच्या निमित्ताने नवी दिल्लीत पोहोचली होती. अभिनेता रणवीर सिंह याने या भेटीचे काही खास क्षण या आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले. रणवीर सिंह या फोटोत नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेताना दिसत आहे. या फोटोला जादू की झप्पी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून आनंद वाटला, असे कॅप्शन दिले आहे.


रणवीरशिवाय नरेंद्र मोदींना भेटण्यास आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन, एकता कपूर, करण जोहर, विकी कौशल, भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा यासारखे बरेच कलाकार गेले होते. अनेक गंभीर मुद्यांवर यावेळी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. करण जोहरने ही बैठक आयोजित केली असल्याचे समजते.