ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड

kishore-pradhan
आपल्या विनोदी अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. मराठीसह त्यांनी इंग्रजी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी चित्रपट, दुरदर्शन आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.

बऱ्याच चित्रपटात किशोर प्रधान यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले’ बोलतोय हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वी मेट’मधीलही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. १९८९मध्ये किशोर प्रधान यांनी इंग्रजी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तब्बल १८ इंग्रजी नाटकात काम केले आहे. इग्लंड, अनेरिका, दुबई, मुस्कट, बँकॉक, इंडोनेशिया या देशांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Leave a Comment