शास्त्रज्ञांचा दावा, एकदाच करा चार्जिंग आणि 800 किमीपर्यंत चालवा कार

car
शास्त्रज्ञांनी एका अशा बहुआयामी वस्तुचे संशोधन केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे विजेवर धावणा-या गाड्या या एकदा चार्जिंग केल्यानंतर चक्क 800 किमी पर्यंतचे अंतर पार करु शकते.

अमेरिकेच्या इलिनोइस विद्यापीठातील संशोधक म्हणाले आहे की, लिथियम-एअर बॅटरी सध्या वापरात असलेल्या लिथियम-आयन बॅटरी पेक्षा 10 पट अधिक जास्त ऊर्जा संग्रहित करू शकते आणि ही बॅटरी वजनाने हलकी देखील आहे. अद्याप त्याचा विकास करण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, लिथियम-एअर बॅटरी अधिक प्रभावी आणि बहुआयामी (टू डी) वस्तू पासुन बनवलेले प्रगत उत्प्रेरकांना समाविष्ट करुन यापासुन अधिक ऊर्जा ही उपलब्ध होऊ शकते. उत्प्रेरक बॅटरीतील रासायनिक प्रतिक्रियाचा वेग वाढवू शकतो आणि ज्या पदार्था पासुन उत्प्रेरक बनले आहे. त्यानुसार, बॅटरीची ऊर्जा साठविण्याची क्षमता वाढते आणि कार्यक्षमतेतही वाढ होउ शकते.

या संशोधनात, शास्त्रज्ञांनी 2 डी ऑब्जेक्ट्सचे सर्वेक्षण केले आहे. जे की उत्प्रेरक म्हणून कार्य करू शकते आणि या उत्प्रेरकांपासून बनविलेल्या बॅटरी परंपरागत उत्प्रेरकांद्वारे तयार केलेल्या लिथियम-एअर बॅटरी पेक्षा 10 पट अधिक ऊर्जा संग्रहित करू शकतात असे आढळून आले. त्यांचा हा शोधनिबंध ‘अॅडव्हान्स मटेरियल’ मासिकांमध्ये प्रकाशित झाला आहे.

Leave a Comment