लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हाच राष्ट्रीय मुद्दा – सुब्रमण्यम स्वामी

ram-mandir
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लवकरच अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल आणि राम मंदिर हाच आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दा असेल, असे म्हटले आहे.

११ आणि १२ जानेवारीला दिल्ली येथे रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. सुब्रमण्यम स्वामी यावर बोलताना म्हणाले, एखाद्या पराभवानंतर, अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने कार्यकर्त्यांत नव्या उर्जेचा संचार होतो. तसेच राम मंदिर निर्माण हा आगामी निवडणुकीत देशपाळीवरील मुद्दा असेल. या अधिवेशनात १२ हजार छोटे मोठे नेते, तसेच कार्यकर्ते उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना विजयाचा कानमंत्र देतील.