PUBG टूर्नामेंट खेळा आणि 1 कोटी जिंका

PUBG1
पबजी मोबाईलने आपला मोबाईल गेम लॉन्च केल्यानंतर एक मोठे यश मिळवले आहे. आतापर्यंत हा गेम 20 दशलक्ष एवढा डाउनलोड केला गेला आहे. या गेमचे उत्पादक टेन्सेंट गेम्स आणि पबजी कापोर्रेशनने ओप्पो पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019 चे आयोजन केले आहे. जे की भारतात आयोजित केला जाणारा सर्वप्रथम ओपन-टू-ऑल टूर्नामेंट असेल.
PUBG
या मालिकेतील विजेत्याला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. कंपनीने याबाबद गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक तसेच ओप्पोचा फोन देखील जिंकता येणार आहे.

या निवेदनात असे देखील म्हटले आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने प्रथम अधिकृत पबजी मोबाइल कॅम्पस चॅम्पियनशिपचे आयोजन केली होते, त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला होता. या स्पर्धेसाठी 30 शहरातील 1000 हून महाविद्यालयांमधून 2,50,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Leave a Comment