‘रॉकेट वाले चाचा’च्या शोधात नासा

Rocket’s-Uncle
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आपण ही पाहून थक्क व्हाल. या व्हिडिओत एक काका चक्क 19 सेकंदामध्ये सिगरेट पासून 11 रॉकेट उडवित आहे.
या काकांना ‘रॉकेट वाले चाचा’ म्हणून ओळखले जात असून. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच लोकांकडून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

काकांच्या या खतरनाक व्हिडिओची ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ही जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक आणि कमेंट आल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, या चाचांची खरी गरज नासाला आहे, तर काहीनी यांच्या करामतीला सलाम केला आहे.
Rocket’s-Uncle1
हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम जिल्ह्यातील पिसनिकाडा गावाचा आहे. काही दिवसापुर्वी मल्ला संजीव राव म्हणजेच रॉकेट अंकल यांनी सिगरेट द्रवारे रॉकेट उडवून चीमलापल्ली गावाच्या एका प्रवाश्याचे स्वागत केले होते.
Rocket’s-Uncle2
या व्हिडिओमध्ये, संजीव आपल्या हातातील खुप सारे रॉकेट घेऊन उभे आहेत आणि सिगरेट ओढता – ओढता दुसऱ्या बाजूला रॉकेट सोडत आहे. संजीव सांगतात की, या स्टंटमध्ये एक छोटीशी चूक जरी झाली तरी मोठा अपघात घडु शकतो. आपण असा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका.

Leave a Comment