'ज्या बसमध्ये पांड्या आणि राहुल असतील, तर त्या बसनेही प्रवास करणार नाही' - Majha Paper

‘ज्या बसमध्ये पांड्या आणि राहुल असतील, तर त्या बसनेही प्रवास करणार नाही’

harbhajan-singh
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यावर टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने देखील आगपाखड केली आहे. हरभजन त्याचबरोबर तर ज्या बसमध्ये पांड्या आणि राहुल असतील, तर मी त्या बसनेही प्रवास करणार नसल्याचे म्हटले आहे.

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून हकालपट्टी करण्यात आली. याबाबत हरभजन सिंहने दोघांच्याही वक्तव्याचा निषेध केला. हरभजन म्हणाला, मित्रांसोबतही आम्ही अशाप्रकारच्या गप्पा मारत नाही, या दोघांनी खुलेआम टीव्ही चॅनेलवर हे वक्तव्य केले. त्यांच्यामुळे अन्य क्रिकेटपटूंबद्दलही लोक तसाच समज करुन घेतील. हरभजनही तसाच असेल, अनिल कुंबळे आणि सचिन हे सुद्धा असेच असतील, असे लोक बोलू शकतील.

Leave a Comment