धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण

dhoni
सिडनी – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलेल्या महेंद्रसिंह धोनीने १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सिडनी एकदिवसीय सामन्यात एक धाव काढत हा विक्रम धोनीने केला आहे, धोनीला याआधी हा विक्रम करण्याची संधी विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत आली होती, पण तो त्यावेळी अपयशी ठरला होता.

धोनीच्या नावावर १० हजार १७३* धावा आहेत, परंतु केवळ ९९९९ धावा या यापैकी भारताकडूनच्या आहेत. उर्वरित धावा त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना केल्या आहेत. आशिया एकादश संघाचे त्याने प्रतिनिधित्व करताना २००७ मध्ये आफ्रिका एकादश संघाविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या.