101 वर्षीय पाकिस्तानी महिलेला 12 वर्षांनंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

pakistan
जोधपुर – पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदु असलेल्या 101 वर्षीय जमुनामाई या शुक्रवारचा दिवस कधीच विसरु शकणार नाही. हा तोच दिवस होता ज्या दिवशी त्यांना 12 वर्ष वाट पाहिल्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळाले. येथील जिल्हाधिका-यांनी दावा केला आहे 101 वर्षीय जमुनामाई या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत ज्यांना या वयात भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. राजस्थानच्या जोधपुरमधील एका छोटे खेडे असलेल्या धानीमध्ये पाकिस्तानातून आलेले 6 अल्पसंख्यांक हिंदुंचे कुटुंब राहते.

सर्वात वयोवृद्ध असलेल्या आपल्या घरातील सदस्याला नागरिकत्व मिळाले त्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. भारतीय नागरिकता अधिनियमता अंतर्गत त्यांच्या अर्जावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. जमुनामाई मागील 12 वर्षांपासून भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्न करत होत्या. आता त्यांना आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील लवकरात लवकर भारतीय नागरिकत्व मिळेल अशी आशा आहे.

याबाबत अधिका-यांचे असे म्हणणे आहे कि, जोधपुरमध्ये आयोजित नागरिकत्व शिबिरादरम्यान त्यांना अशी माहिती मिळाली की यात एका अर्जदार हा सर्वात वयोवृद्ध आहे. रेकॉर्डनुसार अर्जदार जमुनामाई यांचा जन्म अविभाज्य पंजाबमध्ये झाला होता. जोधपुरचे एडीएम जवाहर चौधरी यांनी म्हटले आहे की जमुनामाई यांच्या अर्जला मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांना शुक्रवारी याबाबतचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. त्याचबरोबर जमुनामाई यांना स्थानिक प्रशासनाकडून एक घर देखील देण्यात आले आहे.

Leave a Comment