अमरिश पुरी यांनी गाजवलेले 10 खतरनाक खलनायक

amrish-puri0
हिंदी सिने सृष्टीत विलनची भुमिका साकारणारे अभिनेते अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच छाप सोडली आहे. 12 जानेवारी 2005 रोजी वयाच्या 73 वर्षां अमरीश पुरी यांचे ब्रेन हेमरेजमुळे मृत्यू झाला. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पाहूयात त्यांचे दमदार 10 चित्रपट…

1.1984 मध्ये आलेली इंडियाना जोन्स आणि द टेम्पल ऑफ डोममध्ये अमरीश पुरी यांनी मोला राम ही व्यक्तिरेखा साकारली होती.
amrish-puri1
2.1986 साली प्रदर्शित झालेल्या नागीना चित्रपटात अमरीश पुरी यांनी साकारलेली बाबा भैरवनाथची भूमिका प्रत्येकालाच आठवत असेल. या चित्रपटात अमरीश पुरी यांनी दमदार अभिनय केला होता.
amrish-puri2
3.अमरीश पुरी यांनी 1987 साली प्रदर्शित झालेल्या मिस्टर इंडियामध्ये मोगॅम्बो ही भुमिका साकारली होती. मिस्टर इंडियाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. मोगॅम्बो हे व्यक्तिमत्व एवढे प्रसिद्ध झाले की अमरीश पुरी यांना मोगॅम्बो नावानेच ओळखले जाऊ लागले.
amrish-puri3
4.अमरीश पुरी यांनी ‘लोहा’ चित्रपटात ‘शेरा’ची भूमिका केली होती. हा चित्रपट1987 मध्ये प्रदर्शित झाला.
amrish-puri4
5.मोगॅम्बोच्या भूमिकेनंतर अमरीश पुरी यांनी जास्त करुन विलेनची भूमिका साकारली. 1992 मध्ये तहलका चित्रपटात जनरल डँग भूमिकेने लोकांना घाबरून सोडले.
amrish-puri5
6.राकेश रोशन दिग्दर्शित करण-अर्जुन मध्ये अमरीश पुरी यांनी ठाकुर दुर्जन सिंहची भूमिका केली होती.
amrish-puri6
7.’जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ अमरीश पुरी यांचा हा संवाद सर्वांनाच आठवत असेल आणि त्यांची ती भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला दिलवाले दुल्हनिया ले जायंगेमध्ये अमरीश पुरीने अनिवासी भारतीय व्यक्तिची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झाला होता.
amrish-puri7
8.1997 साली राकेश रोशन यांनी पुन्हा एकदा अमरीश पुरी आणि शाहरुख खान यांना घेऊन कोयला चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. यात अमरीश पुरी यांनी राजा साहबची भूमिका केली होती
amrish-puri8
9.2001 मध्ये रिलीज झालेली गदर: एक प्रेमकथा चित्रपटात अमरीश पुरी यांनी अशरफ अलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते.
amrish-puri9
10.2001 मध्ये अमरीश पुरी यांची आणखी एक चित्रपट रिलीज झाला. नायक या चित्रपटात त्यांनी बलराज चौहानची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका केली होते.
amrish-puri10

Leave a Comment