होस्ट शिवाय होणार यंदाचा ऑस्कर सेरेमनी

oscers
३० वर्षानंतर प्रथमच यंदा ९१ वा ऑस्कर सेरेमनी होस्टशिवाय होणार आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमात एक होस्ट असे त्याऐवजी यंदा विविध विभागात अनेक हॉलीवूड सेलेब्रिटी अॅवॉर्ड प्रदान करतील असे जाहीर केले गेले आहे. २४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम हॉलीवूड डॉल्बी थियेटरमध्ये होत असून भारतात त्याचे लाइव प्रक्षेपण २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० मिनिटांपासून पाहता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाचे निवेदन कॉमेडीयन केविन हार्ट करणार होता. पण केव्हिनने काही वर्षापूर्वी समलैंगिक संबंधाविरोधात त्याची काही मते व्यक्त केली होती. ती विवादित वक्तव्ये ट्विटरवर व्हायरल झाल्यावर केविनच्या निवडीबाबत युजर्सकडून टीकेची झोड उठविली गेली. त्यानंतर आयोजन समितीने केविनने माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र केविनने त्याला स्पष्ट नकार देत होस्ट बनण्यास नकार दिला.

१९२९ साली सर्वप्रथम ऑस्कर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यापैकी ३९, ६९, ७०, ७१ आणि ८९ या वर्षात होस्ट विनाच पार पडला होता आणि आत्तापर्यंत केवळ चार कृष्णवर्णीय सेलेब्रीटिनी होस्टपद भूषविले आहे. केविन होस्ट झाला असता तर तो पाचवा कृष्णवर्णीय ठरला असता.

Leave a Comment