मॅट्रिक परीक्षा पास, भेट मिळाली पोर्शे कार

porsche
दहावी, बारावीच्या परीक्षा मुले पास झाली कि त्यांना आपण कौतुक म्हणून काही ना काही भेटवस्तू आवर्जून देत असतो. पण ही भेट किती महागाची द्यायची याची काही मर्यादा असतेच. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर कुणाला २८ लाखाची अलिशान पोर्शे कार दिली गेली असे सांगितले तर यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच अशी घटना घडली आहे. मॅट्रिक परीक्षा पास झाला म्हणून या मुलाला त्याच्या वडिलांनी चक्क पोर्शे कार भेट दिली आहे.

घटना आहे आफ्रिकेतली. गुमा ग्रुपचे संस्थापक रॉबर्ट गुमेड या कोट्याधीश उद्योजकाने त्याचा मुलगा मटाना रॉबर्ट ज्युनिअर मॅट्रिक परीक्षा पास झाला म्हणून पिवळ्या रंगाची पोर्शे कार भेट दिली त्याचे फोटो भाऊ थेम्बा याने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. थेम्बा सांगतो, कार पाहून मटाना ची प्रतीक्रिया काय होतेय हे आम्हाला पाहायचे होते. अर्थात त्याला या भेटीचा धक्का बसला आणि खूप आनंदही झाला.

गुमा हि गुंतवणूक क्षेत्रातील कंपनी असून गुमेद परिवाराचा हा व्यवसाय खाणी, पर्यटन क्षेत्रातही पसरलेला आहे.

Leave a Comment