मुक्काम्बिका मंदिरात दडला आहे कोट्यावधीचा खजिना

mookambika
कर्नाटकच्या उडपी जिल्यातील कोलूर येथील प्रसिद्ध मुक्काम्बिका मंदिर अतिप्राचीन आहेच पण या मंदिरात कोट्यावधी रुपयांचा खजिना दडला असल्याचे सांगितले जाते. १२०० वर्षे जुने हे मंदिर दाट जंगलात आणि पहाडावर वसलेले असून ते सातमुक्ती स्थळांपैकी एक मानले जाते. मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर असून येथे देवीची तीन रुपात पूजा केली जाते.

सकाळी या देवीची महाकाली रुपात, माध्यानीला महालक्ष्मी तर सायानाकली महासरस्वती रुपात पूजा केली जाते. या मंदिरात ज्योतिर्मय शिवलिंग असून या पीठावर नाग कोरले आहेत. याचा अर्थ या येथे गुप्त खजिना आहे असा होतो असे सांगितले जाते. मुक्काम्बिकेची मूर्ती अतिशय देखणी असून ती आदि शंकराचार्यांनी स्थापन केली आहे.

kollur
या मंदिरात ९० किलो सोन्यापासून बनविलेला रथ, ३ कोटींचे दागिने, ५० कोटींची पाचू, हिरे अशी मौल्यवान रत्ने असून देवीला हे दागिने वेळोवेळी घातले जातात आणि उत्सवाच्या वेळी सोन्याच्या रथातून मिरवणूक काढली जाते. येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्षभर गर्दी असते.

Leave a Comment