पुढील कुंभ ११ वर्षांनीच होणार

haridwar
कुंभ मेळा दर १२ वर्षांनी भरविला जातो मात्र यंदाच्या प्रयागराज अर्धकुंभ नंतर हरिद्वार येथे होणारा कुंभ २०२२ ऐवजी २०२१ लाच भरणार आहे. यापूर्वीचा महाकुंभ उज्जैन येथे भरला होता त्यानंतर ६ वर्षांनी कुंभ होणे अपेक्षित होते मात्र ग्रहस्थिती पाहता हा कुंभ वर्षभर अगोदर म्हणजे २०२१ मध्येच होणार आहे.

जेव्हा मेष राशीत सूर्य आणि कुंभ राशीत गुरु ग्रह प्रवेश करतात तेव्हा कुंभ भरविला जातो. अशी ग्रहस्थिती १२ वर्षातून एकदा येते. पुढील वेळी २०२२ साली मात्र मेष राशीत सूर्य येत असला तरी कुंभ राशीत गुरुप्रवेश होणार नाही. त्यामुळे ही ग्रहस्थिती असलेल्या २०२१ मध्येच कुंभ भरविला जाणार आहे. त्यासाठी ११ विद्वानांच्या समितीने एक परिषद घेऊन याची माहिती दिली आहे.

Leave a Comment