नाणेफेक जिंकून भारताला मिळाली ही खास बग्गी

baggi
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ, राजेन्द्रप्रसाद पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण करण्यासाठी ज्या खास बग्गीतून आली ती बग्गी भारताला नाणेफेक किंवा ओलीसुकी जिंकून मिळाल्याची कथा फार थोड्यांना माहिती आहे.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तो पाकिस्तान फाळणीचे दु:ख उरी घेऊन हे आपल्याला माहिती आहे. फाळणी झाल्यामुळे अखंड भारताच्या जमिनीपासून ते सैन्यापर्यंत विभागणी केली गेली. त्यात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात त्याकाळचे गव्हर्नर जनरल बॉडीगार्ड पथकही दोनास एक या प्रमाणात विभागले गेले. विभागायची राहिली ती या रेजिमेंटचे प्रसिद्ध बग्गी.

या बग्गीवर दोन्ही देशांनी हक्क सांगितला. तोडगा काढण्यासाठी तत्कालीन कमांडन्टनी नाणेफेक म्हणजे ओलीसुकी करण्याचा पर्याय दिला आणि तो मान्य केला गेला. नाणे हवेत उडविले गेले आणि कौल भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे बग्गी भारताकडे राहिली.

भारताची घटना २६ जानेवारीला लागू केली गेली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला गेला तेव्हा पहिल्या कार्यक्रमाला डॉ राजेंद्रप्रसाद या बग्गीतून आले आणि नंतर तिचा प्रथा कायम राहिली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्त्या झाल्यामुळे सुरक्षा कारणास्तव बग्गी ऐवजी राष्ट्रपती बुलेटप्रुफ गाडीतून येऊ लागले. ३० वर्षे अशीच प्रथा राहिली पण १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २९ जानेवारीला होत असलेल्या बिटिंग रिट्रीट कार्यक्रमासाठी याच बग्गीतून येऊन नवी प्रथा पाडली. १४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हीच प्रथा पुढे सुरु ठेवली आहे.

Leave a Comment