संन्यास घेतला की पुन्हा हातात बॅट धरणार नाही विराट

viraat
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने क्रिकेट संन्यास घेण्याबाबत त्याचे मत व्यक्त करताना संन्यास घेतल्यावर प्रथम काय करेन हे आत्ता सांगता येणार नाही पण पुन्हा बॅट हातात धरणार नाही हे नक्की आहे असे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्याने एकदा संन्यास घेतला कि जगातील कुठलीच लीग खेळणार नाही असे सांगितले.

विराट म्हणाला, मी माझ्यापुरते सांगतो आत्ता मी खूप क्रिकेट खेळतो आहे. गेली पाच वर्षे तर खूपच खेळलो आहे. सध्या संन्यास घेण्याचा विचार नाही. पण जेव्हा घेईन त्यानंतर पुन्हा बॅट हातात धरणार नाही. माझ्यातील उर्जा संपेल तेव्हा खेळ सोडेन. आज अनेक क्रिकेटपटू क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अंतरराष्ट्रीय टी २० लीग खेळत आहेत मात्र विराट या पासून लांब राहणार आहे.

Leave a Comment