जॅक मा शी साधर्म्यामुळे धंदा जोरात

jackmaa
चीनच्या अलिबाबा इ कॉमर्सचा संस्थापक आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांच्याशी खूपच साधर्म्य असल्याने चीनच्या झोजीयांग प्रांतातील तोग्शांग शहरातील एक किराणा दुकानदार एकदम फेमस बनला आहेच पण त्याच्या धंदा एकदम जोरात सुरु झाला आहे. ३९ वर्षीय वू शुएलीन हुबेहूब जॅक मा सारखा दिसतो आणि त्याला पाहण्यासाठी तसेच त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी त्याच्या दुकानात लांबलांबून ग्राहक येत आहेत. परिणामी त्याच्या धंद्याला बरकत आली आहे.

सोशल मिडीयावर या दोघांच्यातले साम्य दाखविणारे फोटो प्रसिद्ध झाल्यावर वूच्या फोलोआरची संख्या १३ लाखाचा वर गेली आहे. त्यामुळे त्याने त्याचे अकौंटवरचे नाव बदलू लिटील जॅक मा असे केले आहे. अर्थात वू ला त्याचे जॅक मा शी साम्य आहे याचा अभिमान वाटतो आणि गर्वही वाटतो. जॅक मा याला जेव्हा हि हकीकत कळली तेव्हा त्याने वू ला दुकांसाठी मदत करण्याची तयारी दाखविली पण वू ने ती नाकारली. तो म्हणतो हे दुकान मी सोडणार नाही.

जॅक मा चीनमध्ये खूपच लोकप्रिय आहे. एका माणसाने जॅक मा सारखे दिसण्यासाठी १ कोटी खर्च करून प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे तर अन्य एक ९ वर्षाचा मुलगा जॅक मा सारखा दिसतो आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर आल्यावर जॅक मा ने या मुलाच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे असेही समजते.

Leave a Comment