नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन (इस्रो) संघटनेचे अध्यक्ष के. सिवान यांनी आज गगनयान मिशनच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी सांगितले की, या मोहिमेवरील काम सध्याच्या घडीला सुरु आहे आणि इस्रोसाठी हा मोठा टर्निग पॉइंट आहे. सिवान पुढे म्हणाले की, दोन मानव रहित अंतरिक्ष अभियानांचे लक्ष्य डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 मध्ये ठेवले गेले आहे. याशिवाय, डिसेंबर 2021 च्या दरम्यान मानव मिशनसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
सात भारतीय 2021 मध्ये करणार अंतराळयात्रा
बजेट पास झाल्यानंतर कर्मचा-यांच्या प्रशिक्षणावर काम सुरू झाले आहे. परदेशी प्रशिक्षकांना देखील यात समाविष्ट केले जाऊ शकते. क्रू मेंबर सदस्यांची निवड इस्रो आणि आईएएफ हे संयुक्तपणे करतील. त्यांना त्यानंतर दोन ते तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येईल. या मोहिमेसाठी राकेश शर्मांचा सल्ला घेतला जाईल. राकेश शर्मा हे भारताचे प्रथम व्यक्ती आहे की ज्यांनी अंतराळ यात्रा केली आहे. पण ते सोव्हियत संघ मिशनसाठी गेले होते. 2022 पर्यंत भारतीय एजन्सीच्या जोरावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.
तज्ञांचा मते, मानव मिशन हे अत्यंत कठीण काम आहे. ते जर सोपे असेल तर आज जगातील केवळ तीन देश यशस्वी नसते, याच्या यादीत इतर देश देखील असते. इस्रोला बाहुबली रॉकेटसाठी मानवाचे रेटिंग बनवावे लागेल, त्याला एक मॉड्यूल तयार करावे लागेल. याशिवाय, अंतराळात अंतराळवीर काय काम करणार आणि तो काय खाणार यावर देखील काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर अंतराळवीराला पृथ्वीवर आणण्यासाठी देखील उपाययोजना कराव्या लागणार आहे. याबाबत इस्रोचे असे म्हणणे आहे, की अंतराळवीरांची अरबी समुद्रात वापसी होईल आणि हे करणे खुप जोखमीचे असु शकते, पण त्यासाठी लागणारी सर्व उपाययोजन इस्रो करीत आहे.