रशियाचा डॉलरला नकार, 100 अब्ज डॉलर्सचे युआन, येन व यूरोमध्ये रूपांतर

dollar
रशियाने डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे ठरविले असून डॉलरमधील रक्कम अन्य चलनांमध्ये बदलली आहे. यामुळे रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धात आणखी भर पडली असून तणावही वाढण्याची शक्यता आहे.

रशियाची मध्यवर्ती सेंट्रल बँक ऑफ रशियाने 100 अब्ज डॉलर्सचे रूपांतर चिनी युआन, जपानी येन आणि यूरोमध्ये केले आहे. देशाच्या परकीय गंगाजळीतील डॉलर्सचे प्रमाण आता ऐतिहासिकरीत्या कमी पातळीवर आले आहे.

सेंट्रल बँकेच्या ताज्या तिमाहीच्या अहवालात दिलेल्या माहितीनसार, रशियाच्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी डॉलरचा वाटा मार्च आणि जून 2018 या केवळ तीन महिन्यांत नाट्यमयरीत्या घटला असून तो 43.7 टक्क्यांवरून 21.9 टक्क्यांवर आला आहे.

रशियाने डॉलरचा त्याग करणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले होते. रशियाने गेल्या वर्षी एप्रिल आणि मेमध्ये अमेरिकी ट्रेझरी बॉण्ड्स अभूतपूर्व प्रमाणात मोडीत काढण्यास सुरूवात केली होती. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव वाढण्याचा हा काळ होता. अमेरिकेने रशियन उद्योजक, कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांवर निर्बंध घातल्यानंतर रशियाकडून हे पाऊल उचलण्यात आले होते.

Leave a Comment