संजय जाधवच्या आगामी ‘लकी’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

lucky
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘लकी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आल्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणेदेखील रिलीज करण्यात आले आहे. नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बप्पी लहरी आणि वैशाली सामंतचा आवाज अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘कोपचा’ या गाण्याला लाभला आहे.

अभय आणि दिप्ती ‘कोपचा’ गाण्यात जितेंद्र-श्रीदेवीच्या ‘नैनो में सपना’ या गाण्यातील लूकप्रमाणे दिसत आहे. ‘लकी’ हा चित्रपट आजच्या तरूणाईची कथेवर आधारित आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ यांनी लकी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ७ फेब्रुवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व थिएटरमध्ये झळकणार आहे.