विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात पुणेरी पगडीवरुन राडा

pune-university
पुणे – काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यादरम्यान ‘कुलगुरू हाय हाय’ असा नारा देत सोहळ्यातील पुणेरी पगडीचा जाहिर निषेध केला. कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलण्यास सुरूवात केली. काही विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी त्यावेळी सोहळ्याच्या मुख्य मंडपात आले आणि कुलगुरू यांच्या विरोधात घोषणबाजी करु लागले. विद्यार्थ्यांनी ‘महात्मा फूले की जय, सावित्रीबाई फुले की जय’ अशा घोषणाही दिल्या. त्यांनी यावेळी ‘कुलगुरू यांचा धिक्कार असो’ अशा देखील घोषणा दिल्या. विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी काही क्षणात संबंधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. विद्यापीठातील वातावरण या निषेधामुळे काही काळ तापले होते. कुलदीप आंबेकर आणि यासह अन्य विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.