बेस्टच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

high-court
मुंबई – गेल्या ३ दिवसांपासून शहरात ३२ लाख प्रवाशांना दररोज सेवा देणाऱ्या बेस्टच्या संपामुळे बस रस्त्यावर न उतरल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हणत यात न्यायालयाने हस्तक्षेप करत त्वरित संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अॅड. दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली असून यावर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील व न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होईल. गुरुवारी बेस्ट प्रशासन, महापालिका व राज्य सरकारला याबद्दल न्यायालयाने नोटीस पाठवली असून या संदर्भात तातडीची सुनावणी घेतली आहे.

Leave a Comment