एकेकाळी गरीबीमुळे त्रस्त असलेली महिला आता महिन्याकाठी कमावते 13 लाख रुपये

ratna-verma
रायपूर : मोठ्यातल्या मोठ्या अडचणींवर जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर मात करता येते. याचे एक उदारहण आहे रत्ना वर्मा. अडचणींची सामना करत त्यांनी बचत गटाची सुरुवात केली आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी त्याचबरोबर त्यांनी मजूर परिवारातील महिलांना आपल्यासोबत घेऊन त्यांनाही आर्थिकरित्या सक्षम बनवले.

रत्ना अमेरी गावात बचत गट चालवते. मशरूमचे उद्पादन आणि जैविक औषधी तयार करत या गटाद्वारे दर महिन्याला 13 लाख रूपयांची कमाई करत आहे. यांच्या समुहामध्ये सध्या 13 महिला कार्यरत आहेत. पण अप्रत्यक्षपणे 50 पेक्षाही अधिक महिलांना यांच्या व्यवसायातून लाभ होत आहे. याबाबत अधिक माहिती देताना रत्ना वर्मा सांगतात की, घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. घरीच काहीतरी करण्याचा निश्चय तेव्हा त्यांनी केला. यादरम्यान गावातील एकाने मशरूमची शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले होते.

पैशांची चणचण कामाची सुरुवात करण्यासाठी भासली होती. यामुळे आजीविका मिशन बिहानसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बचत गटाची स्थापना केली आणि इतर महिलांना त्यामध्ये सामावून घेतले. पहिल्या महिन्यात या व्यवसायातून साडे चार हजार रुपये कमाई झाल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा फक्त लोकांच्या घरापर्यंतच त्यांच्या या प्रॉडक्टची विक्री होती.
ratna-verma1
रत्ना यांनी पुढे सांगितले की, मशरूमची पॅकिंग करून हॉटेल आणि दुकानांमध्ये त्याची काही काळानंतर विक्री करत होते. यामुळे उत्पन्नात चांगला नफा होत होता. गुणवत्ता असल्यामुळे मागणी वाढली. आता मशरूमची अॅडव्हान्समध्ये बुकींग होत आहे. रत्ना आता मशरूमचे लोणचे, मशरूमचा पोषक आहार, पावडर आणि फेसपॅक देखील तयार करत आहेत. प्रॉडक्टसाठी बिहान योजनेअंतर्गत पॅकिंग, लेबलिंगसह मार्केटमध्ये दाखल करण्यात मदत होत आहे.

रत्ना यांनी एक मॉडल स्वंयसहायता समुहाच्या रूपात बिहान बाजार, कृषीमेळा, लोक सुराज आणि मिशन 25-25 इत्यादी कार्यक्रमात मशरूमच्या उत्पादनांचा स्टॉल लावला असल्याचे सांगितले. आपल्या गावात रत्नाची कृषी मित्र म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रत्येक घरी जाऊन महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहे. याशिवाय गावातील लोकांना शेती व्यवसायासाठी प्रेरित करत आहे. मशरूमच्या उत्पादनांसोबत शेण, गोमुत्र, झाडांचा पालापाचोळा इत्यादी पासून निमास्त्र, ब्रम्हास्त्र सारख्या जैविक औषधांची रत्ना निर्मिती करत आहे. एका मास्टर ट्रेनच्या रूपात 1200 पेक्षा अधिक महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.