चार लाख एकर जमिनीचे मालक आहेत जेफ बेझॉस

jeff-bezos
वॉशिंग्टन – जेफ बेझॉस यांनी आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत मी लोकांना माहिती देऊ इच्छितो असे सांगत पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती ट्विटद्वारे देताच चर्चाना उधाण आले आहे. कारण, जेफ बेझॉस यांच्या पत्नीला घटस्फोटानंतर मिळणारी संपत्ती. सेलेब्रिटी किंवा मोठ्या उद्योजकाचा घटस्फोट हा काही नवीन विषय नाही. पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा घटस्फोट आहे.

जेफ बेझॉस हे जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन स्टोअरचे म्हणजेच अ‍ॅमेझॉन या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यासंदर्भात ब्लूबर्गच्या माहितीनुसार एकूण 137 बिलियन डॉलर (तब्बल 10 हजार अब्ज) एवढी जेफ बेझॉस यांच्याकडे संपत्ती आहे. 80 मिलियन शेअर्सचा त्यात वाटा आहे. बेझॉस यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा आहे, तर 4 लाख एकरची या जोडप्याकडे मालमत्ता आहे.

बेझॉस यांची संपत्ती एवढी अफाट आहे की ते तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच परंतु जर घटस्फोटानंतर प्रॉपर्टीचे सामान वाटप करून त्यांच्या पत्नीला निम्मा वाट मिळाला (69 बिलियन डॉलर) तर त्यांची पत्नी जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. पण, त्याचबरोबर बेझोस यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान धोक्यात येऊन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या 92.5 बिलियन डॉलरची संपत्ती आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. 25 वर्षांच्या संसारानंतर बेझोस घटस्फोट घेणार आहेत. 54 वर्षीय जेफ बेझॉस लॉरेन सांचेझच्या (49) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे.