मित्राच्या पत्नीशी अफेअर पडले ६९ अब्ज डॉलर्सला

jeff-bezos1
अमेरिकेतील ‘नॅशनल एक्वायर’ या वृत्तपत्राने अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस आणि त्यांची मॅकेन्झी यांच्या घटस्फोटामागील कारण स्पष्ट केले असून यासंदर्भात या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार जेफ यांचे त्यांच्या मित्राच्या पत्नीशी अफेअर सुरु असल्यामुळेच मॅकेन्झीने जेफला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ यांना हा घटस्फोट झाल्यास मॅकेन्झीला संपत्तीमधील अर्धा वाटा म्हणजेच ६९ अब्ज डॉलर एवढी किंमत मोजावी लागणार आहे.

सध्या लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात ५४ वर्षीय जेस बेझॉस हे पडले आहेत. एका नृत्याच्या कार्यक्रमाची सुत्रसंचालक म्हणून लॉरेन ही काम करते. ती त्याआधी एका वृत्तवाहिनीची न्यूज अँकर होती. हॉलिवूडमध्ये टॅलेण्ट एजंट म्हणून काम करणारा सांचेझचा पती पॅट्रीक व्हाईटसेल आणि बेझॉस दोघे चांगले मित्र आहेत. लॉरेन सांचेझला बेझॉस यांनी पाठवलेले काही प्रेमाचे मेसेजही आपल्याकडे असल्याचा दावा ‘नॅशनल एक्वायर’ने केला आहे. सांचेला बेझॉसने पाठवलेल्या मेसेज पैकी एक मेसेज “I want to smell you, I want to breathe you in. I want to hold you tight… I want to kiss your lips… I love You. I am in love with you.” असा असल्याचे बोलले जात आहे. नुकताच पॅट्रीकला सांचेझने घटस्फोट दिला असून ती नवऱ्यापासून विभक्त राहते.

Leave a Comment