इम्रान हाश्मीने बदले ‘चीट इंडिया’चे टायटल

imran-hashmi
सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत मुलभूत बदल होणे का आवश्यक आहे, यावर भाष्य करणाऱ्या ‘चीट इंडिया’ चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी एका भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण आता या चित्रपटाच्या शीर्षकात प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच बदल करण्यात आला आहे.


या चित्रपटाचे आधी चीट इंडिया-नकल में ही अकल हैं! असे शीर्षक होते. पण सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेतल्यानंतर आता ‘व्हाय चीट इंडिया’ असे चित्रपटाचे शीर्षक करण्यात आले आहे. इम्रान हाश्मीने का? ते विचारू नका, असे म्हणत हे नवे नाव जाहीर केले आहे.

चित्रपटाची कथा शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या गैरकारभारावर आणि हुशार विद्यार्थ्यांना हेरुन त्यांचा वापर डमी परीक्षार्थीसाठी कशा प्रकारे केला जातो, यावर आधारित असणार आहे. सौमिक सेन यांनी ‘चीट इंडिया’ या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यात इमरान हाश्मी आणि श्रोया धन्वंतरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.