अवघ्या 54 तासात सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांची पुन्हा हकालपट्टी

alok-verma
नवी दिल्ली – पुन्हा एकदा आलोक वर्मांना सीबीआयच्या प्रमुखपदावरुन हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बुधवारीच आलोक वर्मांना सक्तीच्या रजेनंतर सीबीआय प्रमुखपदी नेमण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याने पुन्हा एकदा सीबीआयमधील अंतर्गत राजकीय वाद उफाळून आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय या समितीत न्यायाधीश एके सिक्रा व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता. २-१ या मताधिक्याने आलोक वर्मांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्मांना हटवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.

Leave a Comment