महिला डॉक्टर, नर्सना ब्लॅकमेल केल्याबद्दल पाकिस्तानी अभियंत्याला 24 वर्षांची शिक्षा

blackmail
तब्बल 200 महिला डॉक्टरांना आणि नर्सना त्यांच्या सोशल मिडिया अकाउंट्सवरून ब्लॅकमेल केल्याबद्दल पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने एका अभियंत्याला 24 वर्षांची शिक्षा सुनावली आहे सोशल मीडियाच्या गुन्ह्यांशी संबंधित दोषींना ठोठावण्यात आलेली ही देशातील सर्वात मोठी शिक्षा आहे
लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश सजाद अहमद यांनी बुधवारी हा निर्णय दिला अब्दुल वहाब असे आरोपीचे नाव असून त्याला एकूण 24 वर्षांच्या शिक्षेसह 7 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे

न्यायाधीशांनी वहाब याला 14 वर्षांच्या तुरुंगवासासह 500,000 रुपये दंड ठोठावला याशिवाय त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 100,000 रुपये दंड ठोठावण्यात आले तसेच त्याला आणखी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि 100,000 रूपये दंड ठोठावण्यात आला या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावायच्या आहेत, असे न्यायाधीशांनी म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे

वहाब हा पाकिस्तानी पंजाबच्या लेहा जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याने महिला डॉक्टर आणि लाहोरच्या काही शासकीय शिक्षण संस्थांच्या परिचारकांसह सुमारे 200 महिलांना ब्लॅकमेल केले होते हे प्रकरण 2015 मध्ये उघडकीस आले होते त्यानंतर, यंग डॉक्टर्स असोसिएशनच्या (वाईडीए) तक्रारीवरून लाहोर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.