दुबईतील या शेखने विशेष नंबरप्लेटसाठी मोजलेत कोट्यावधी डॉलर्स

al-marzuki
दुबई हे एक खास शहर आहे. येथील इमारती, रस्ते, आणि शानोशौकत काही आगळीच. येथील धनाढ्य शेख आणि त्यांचे महागडे छंद नेहमीचा चर्चेत असतात. महागड्या कार्स, स्पेशल एडिशन कार्स साठी ते कोट्यावधी डॉलर्स मोजतातच पण या कार्सना विशेष नंबरप्लेट घेण्यासाठीहि कोट्यावधी डॉलर्स मोजतात. अल मोहम्मद मरझुकी हा असाच एक धनाढ्य शेख असून त्याला विंटेज कार्सचा शौक आहे.

तो सांगतो त्याला ८ हा आकडा विशेष प्रिय असून त्याच्या सर्व कार्स, मोबाईल मध्ये हा आकडा त्याला हवा असतो. त्याच्या फेरारीसाठी त्याने ८८८८ हा नंबर घेतला असून त्यासाठी १ कोटी १४ लाख खर्च केला होता. तसेच त्याच्या संग्रही ८८८८८ असाही विशेष नंबर असून त्यासाठी त्याने १ कोटी ७२ लाख मोजले आहेत. असे महागडे ११ विशेष नंबर त्याच्याकडे आहेत आणि हे सगळे व्हीआयपी नंबर आहेत. त्याने लोम्बार्गिनी साठी ८६८६ असा विशेष नंबर मिळविला आहे. तो सांगतो पूर्वी मी हौस म्हणून हे करत असे आता व्यवसाय म्हणून करतो. सोशल मिडीयावर माझ्या फोलोअरची संख्या प्रचंड वाढली असुन त्याचे मला मोठे नवल वाटते आहे.

अर्थात सर्वात महाग नंबर २००८ मध्ये १ कोटी ४२ लाखात विकला गेला होता आणि तो नंबर होता १. याची रुपयातील किंमत १०० कोटी असून तो आजही सर्वात महाग नंबर आहे. येथे अश्या विशेष नंबरचे लिलाव पुकारले जातात आणि येथील सरकार त्यातून करोडो डॉलर्सचा महसूल मिळविते.

Leave a Comment